देशातल्या नागरिकांना मिळाल्या कोविड प्रतिबंधक लशीच्या ९९ कोटी २० लाखांहून अधिक मात्रा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीच्या आतापर्यंत ९९ कोटी २० लाखांहून अधिक मात्रा मिळाल्या आहेत. आज २० लाखांहून अधिक मात्रा लाभार्थ्यांना देण्यात आल्या. देशातल्या ७० कोटी २६ लाख नागरिकांनी एक मात्रा घेतली असून सुमारे २९ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालं आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे सव्वा ९ कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत. ६ कोटी ३७ लाखाहून अधिक नागरिकांनी पहिली तर २ कोटी ८६ लाखाहून अधिक नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे. देशात गेल्या २४ तासात १४ हजार ६२३ नव्या रुग्णांची नोंद झाली तर १९ हजार ४०० हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या देशातला रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे.