राज्यात काल २५ लाख ६२ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेत देशभरात आज दुपारपर्यंत लसींच्या एकूण ९६ कोटी ५९ लाखापेक्षा अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी २७ कोटी ४९ लाखाहून अधिक जणांना लसीची दुसरी मात्रा मिळाली आहे. लसीकरणाच्या आज २७१ व्या दिवशी दुपारी अडीच वाजेपर्यंत देशभरात २५ लाख ६२ हजाराहून अधिक मात्रा दिल्या गेल्या आहेत.राज्यातही आज दुपारपर्यंत ८ कोटी ९७ लाखाहून जास्त लस मात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी २ कोटी ७५ लाखाहून अधिक जणांना लसीची दुसरी मात्रा मिळाली आहे. आज दुपारी अडीच वाजेपर्यंत राज्यात ४ लाख २४ हजारापेक्षा अधिक  मात्रा दिल्या गेल्या आहेत.