महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

  महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या  जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

मुंबई : महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. दिवंगत प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांचीदेखील 117 वी जयंती असल्यामुळे त्यांच्याही प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन महापुरुषांना वंदन केले.

यावेळी राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे कार्यरत सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभागाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनीदेखील महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आज सेवाग्राम, वर्धा येथे जाणार असून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातर्फे आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.