मुंबईतल्या रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले. केंद्र शासनाच्या जमिनीवरील मुंबईतल्या रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा सह्याद्री अतिथीगृह इथं आढावा घेण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ज्या योजनांमध्ये झोपडीधारकाचं भाडं थकित असून, पुनर्वसनाचं काम रखडलं आहे, अशा योजनांसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत निविदा काढून नवीन विकासकांची नियुक्ती करणं.झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि म्हाडा यांच्या संयुक्त भागीदारी अंतर्गत योजना पूर्ण करणं. शासकीय जमीन धारणीधारक ‘क मध्ये म्हणजेच वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करायला मुभा देणं, रखडलेल्या योजनांबाबत वर्तमानपत्रात जाहिरात देऊन इच्छुक असलेल्या वित्तीय संस्थांकडून 45 दिवसांच्या कालावधीत अर्ज मागवणं, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. केंद्र शासनाच्या 8 हजार 334 एकर जमीनीवर हे प्रकल्प रखडले आहेत.  

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image