प्रधानमंत्री येत्या रविवारी मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधतील. मन की बात या कार्यक्रमाचा हा ८२ वा भाग आहे. या कार्यक्रमात आपले विचार माडण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी जनतेला केलं आहे. याबाबतचे आपले विचार आपण नमो ॲप तसंच MyGov open forum वर नोंदवू शकता. आपले विचार हिंदी किंवा इंग्रजीतून १८००-११-७८०० या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर फोन करून येत्या शुक्रवारपर्यंत नोंदवू शकता. १९२२ या क्रमांकावर मिस्ड कॉल करून मिळणाऱ्या लिंकवरूनही तूम्ही तुमच्या सूचना पाठवू शकता.