साखर कारखान्यांना प्राप्तीकर माफ करण्याची अधिसूचना जारी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या सहकारी साखर कारखान्यांना आता २०१६ नंतर प्राप्तीकर लागू असणार नाही. याबाबतची अधिसूचना केंद्र सरकारनं नुकतीच जारी केली. सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना अधिकची रक्कम अदा केल्यानं, त्यांना प्राप्तीकर विभागाच्या नोटीस येत होत्या. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं ही अधिसूचना जारी केली आहे. सासंदर्भात मागच्या आठवड्यात भाजपा शिष्टमंडळानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन याबाबतची वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यावर केंद्र सरकारनं तातडीनं निर्णय घेतल्याबद्दल फडणवीस यांनी अमित शाह यांचे आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आभार मानले आहेत.