देशभरात आज पोलीस स्मृती दिन साजरा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज पोलीस दिन आज साजरा केला जात आहे. देशाप्रति पोलीस कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि त्यागाचं स्मरण करण्यासाठी दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. याच दिवशी १९५९ या वर्षी केंद्रीय आरक्षित पोलीस दल अर्थात सीआरपीएफने लडाखच्या हॉट स्प्रिंग्स इथं अतुलनीय शौर्य गाजवलं होतं. सीआरपीएफ आणि गुप्तचर संघटनेचं हे गस्ती प थक एका बेपत्ता हेरपथकाच्या शोधार्थ गेलं असताना चीननं त्यांच्यावर अचानक हल्ला केला. संख्येने आणि शस्त्रास्त्रांनी वरचढ असलेल्या चीनच्या सैन्याशी अवघड ठिकाणीही या पथकानं लढा दिला आणि या लढाईत सीआरपीएफचे १० जवान शहीद झाले. त्या निमित्तानॉं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शहीद झालेल्या पोलिसांना नवी दिल्लीच्या राष्ट्रीय पोलीस स्मारकात आदरांजली वाहिली.