देशात काल ५५ लाख ८९ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या १०३ कोटी ६५ लाख ६८ हजार ४१० मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल ५५ लाख ८९ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. आज शेवटची बातमी हाती आली तोपर्यंत ३० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या होत्या.महाराष्ट्रात काल ४ हजार ५९६ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ४ लाख ७४ हजार ९२८ नागिराकांना लस दिल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ९ कोटी ६२ लाख ८३ हजार ५५१ मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत.