देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७ शतांश टक्के

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७ शतांश टक्के झाला आहे. काल 19 लाख 808 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत 3 कोटी 33 लाख 62 हजार 709 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात काल 18 हजार 987 नवे रुग्ण आढळले. सध्या देशभरात २ लाख ७ हजार ६५३ रुग्ण उपचार घेत आहेत.