राज्यात आज ३ कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण पूर्ण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या ३ कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण आज पूर्ण झालं. राज्यात काल ४ हजार ५८० लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ५ लाख २८ हजार ८५३ नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात कालपर्यंत ९ कोटी ५८ लाख ८ हजार ६२३ मात्रा लाभार्थांना दिल्या असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे. त्यापैकी ६ कोटी ६० लाखांहून अधिक नागरिकांना पहिली मात्रा मिळाली असून ३ कोटी ६५ लाखाहून अधिक नागरिकांना दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत.देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या एकशे दोन कोटी ९६ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यापैकी ३१ कोटी २ लाख नागरिकांना लशींच्या दोन्ही मात्रा मिळाल्या असून इतरांना पहिली मात्रा मिळाली आहे.  काल ६४ लाख ७५ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

Popular posts
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
एम. व्ही. मंगलम या कार्गो जहाजावरच्या १६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश
Image
देशांतर्गत मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी ७३ हजार कोटीची घोषणा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image