भाईंदर कोविड उपचार केंद्रात महिलेचे चित्रीकरण व ब्लॅकमेल प्रकरणी कडक कारवाई करण्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

  डॉ.नीलम गोऱ्हे यांचा संक्षिप्त जीवन परिचय

मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या भाईंदर कोविड उपचार केंद्रात महिला  परिचारिकेचे चित्रीकरण व ब्लॅकमेलप्रकरणी तेथील कंत्राटी कर्मचाऱ्यावर दिनांक 14 ऑक्टोबर 2021 रोजी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी पोलीस आयुक्त यांना पत्राद्वारे दिले आहेत.