राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम आश्रमाला देणार भेट

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गांधी जयंतीनिमित्त आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम आश्रमाला भेट देणार असून हिंदी विश्व विद्यालयातील ‘दीपोत्सव’ कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सेवाग्राममध्ये आज अखंड सूत्रयज्ञाद्वारे गांधीजींना आदरांजली वाहण्यात येणार आहे. याशिवाय सामुहिक श्रमदान, भजन, प्रार्थना असे कार्यक्रमही होणार आहेत. जिल्हा सर्वोदय मंडळाच्या वतीनं शहरातील गांधी पुतळा ते सेवाग्राममधील बापू कुटीपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे.