दहशतवाद पूर्णपणे संपावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद पूर्णपणे संपावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा जम्मू- काश्मीरच्या तीन दिवसाच्या  दौऱ्यावर असून त्यांनी आज जम्मूमधल्या भगवती नगर इथं  सभेला संबोधित केलं. जम्मूमधल्या नागरिकांवर वर्षानुवर्षे अन्याय झाला. मात्र हा कालखंड आता संपला असल्याचं ते म्हणाले. विकासाच्या युगात आता कोणीही बाधा आणू शकणार नाही, अशी ग्वाही शहा यांनी दिली. युवापिढी जम्मू-काश्मीरचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  प्रधानमंत्री मोदी यांनी काश्मीरमध्ये तळागाळाच्या स्तरापर्यंत लोकशाही स्थापित केली असून  मोदी यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे असं ते म्हणाले. शहा यांनी केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरच्या विकासासाठी उचललेल्या पावलांची माहिती दिली.