देशात बुधवारी १८ हजार ४५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १८ हजार ४५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर १७ हजार ५६१ जण कोरोनमुक्त होऊन घरी गेले. देशभरात सध्या १ लाख ७८ हजार ८३१  रुग्ण उपचाराधीन असून मार्च २०२० पासूनची ही सर्वात कमी रुग्ण संख्या आहे.