ऊसतोड कामगारांच्या नोंदणीसाठीच्या अॅपचं लोकार्पण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रत्येक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा स्तरावर ग्रामसेवकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करून, ऊसतोड कामगारांची नोंदणी प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून घ्यावी, अशी सूचना, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. बीड इथं ऊसतोड कामगारांची डिजिटल पद्धतीने नोंदणी करून त्यांना तात्काळ ओळखपत्र देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या, 'ई-ऊसतोड कल्याण' या ॲपचं लोकार्पण काल मुंडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. हे ॲप प्रायोगिक तत्वावर बीड जिल्ह्यातल्या कामगारांची नोंदणी कमीत कमी वेळेत करण्यासाठी तयार करण्यात आलं असून, यानंतर संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image