५२ वा इफ्फी चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या अभिजात आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटांचं व्यासपीठ असलेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात यावर्षीचा ५२ वा इफ्फी चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात होणार आहे. मात्र कोविड-१९ ची परिस्थिती लक्षात घेता हा महोत्सव दूरदृश्यप्रणाली आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवाला वैयक्तिकरित्या उपस्थित राहू इच्छिणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे.  महोत्सवामध्ये मार्गदर्शक तत्त्वांनुसार या प्रतिनिधींना प्रवेशासाठी मान्यता दिली जाईल, असं पत्र सूचना कार्यालयानं म्हटलं आहे.