अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानापोटी १० हजार कोटींचं अर्थसहाय्य देण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात यावर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर,तर बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे.पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्याचा निर्णयही काल राज्य मंत्रिमंडळानं घेतला. केंद्र पुरस्कृत अमली पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना राज्यात राबवण्यास देखील मान्यता देण्यात आली. तसंच राज्यातील अकृषी विद्यापीठं आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील बिगर नेट - सेट अध्यापकांना निवृत्तीवेतनाचा लाभ देणं आणि कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कलाकारांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णयही काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image