पाणबुडीवरून डागता येणाऱ्या नवीन क्षेपणास्त्राची उत्तर कोरियाद्वारे चाचणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर कोरियाने पाणबुडीवरून डागता येईल अशा नव्याने विकसित केलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या दोन वर्षातलं अशा प्रकारचं हे उत्तर कोरियाचं पहिलंच शस्त्र आहे. काल दक्षिण कोरियाच्या लष्कराने जपानच्या किनाऱ्याजवळ एक शस्त्रास्त्र चाचणी झाल्याचं नोंदवलं होतं. या क्षेपणास्त्रात अत्याधुनिक नियंत्रण यंत्रणा असल्याची माहिती उत्तर कोरियाने दिली आहे. या चाचणीमुळे देशाची संरक्षण यंत्रणा नव्या उंचीवर पोहोचेल आणि पाण्याच्या खालून काम करण्याच्या नौदलाच्या क्षमतेत वाढ होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.