बुद्ध आजही भारताच्या संविधानाची प्रेरणा असल्याचं प्रधानमंत्री यांचे प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :बुद्ध आजही भारताच्या संविधानाची प्रेरणा आहेत, बुद्धांचं धम्म-चक्र भारताच्या तिरंग्यावर  विराजमान होऊन आपल्याला गती देत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कुशीनगर इथल्या महापरीनिर्वाण मंदीरात अभिधम्म दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी ते बोलत होते. आजही कोणी जेव्हा भारताच्या संसदेत प्रवेश करतो तेव्हा ‘धर्म चक्र प्रवर्तनाय’ या मंत्राकडे त्यांची नजर जातेच, असंही ते म्हणाले. श्रीलंकेहून कुशीनगर आलेल्या पहिल्या विमानानं बौद्ध भिख्कू शिष्टमंडळाचं इथं झालेलं आगमन दोन्ही देशांमधलं अध्यात्मिक संबंध दृढ असल्याचं जिवंत प्रतिक आहे, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण केलं, तर जगाला भेडसावणारा पर्यावरणाच्या समस्येवरही आपण मात करू शकतो, असंही ते म्हणाले.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image