प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतरच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनाची २० वर्ष पूर्ण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतरच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनाची आज २० वर्ष पूर्ण झाली. ७ ऑक्टोबर २००१ या दिवशी त्यांनी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली होती. मोदींच्या जनसेवेची ही वीस वर्षे भारताला समृद्ध आणि सशक्त वैश्विक नेता बनवण्यासाठी समर्पित होती. त्यांचा 'राष्ट्र प्रथम' हा मंत्र विकासाला चालना देत आहे. मुख्यमंत्री पदावर राहून त्यांनी गुजरातला विकासाचे मॉडेल म्हणून सर्वांसमोर प्रस्तुत केलं होतं. २०१४ मध्ये प्रधानमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करत त्यांनी नव्या युगाची सुरुवात केली.बँकेत खाती उघडण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री जनधन योजना लागू केली. या योजनेत गरिबांना जीवन आणि आरोग्य विमा सुरक्षा तसेच मोफत कर्जाची सुविधा मिळाली. डिजिटल आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत भारत सर्वोच्च स्थानावर आहे. जनधन, आधार, यूटीआय को - वीन यासारख्या ॲपची जागतिक स्तरावर प्रशंसा झाली आहे. प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रहितासाठी अनेक मोठे आणि साहसी निर्णय घेतले आहेत. प्रधानमंत्री किसान योजना ही शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी योजना आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासन काळात वस्तू आणि सेवा कर यासारख्या मोठ्या सुधारणा करण्यात आल्या. मोदी सरकारच्या कार्यकाळात दहशतवादाला कडक पायबंद घालण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सुशासनाला आज २० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी  शुभेच्छा दिल्या आहेत.  देशातल्या गरिबांचा उध्दार आणि देशाचा विकास यासाठी प्रधानमंत्री मोदी संपूर्ण समर्पित आहेत असं नड्डा यांनी म्हटलं आहे.