देशाला केंद्रस्थानी ठेवून लोककल्याणासाठी प्रधानमंत्र्यांनी सर्वंकष धोरणात्मक निर्णय घेतल्याचं, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकांच्या कल्याणार्थ देशाला केंद्रबिंदू मानून सर्वंकष धोरणात्मक निर्णय घेतले असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीमार्फत नवी दिल्ली आयोजित लोकतंत्र परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या २० वर्षात नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. अशिक्षित लोकांसह कोणताही देश पुढे जाऊ शकत नाही. हे लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी शिक्षणाला प्रोत्साहन दिलं. विद्युतीकरण, आदिवासी विकास यासह विविध कल्याणकारी योजना राबविल्या, असं ते म्हणाले. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस सुद्धा उपस्थित होते. देशात अनेक व्यवस्थापन गुरू आहेत. मात्र गव्हर्नन्स गुरु केवळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत, असं त्यांनी सांगितलं.