प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वाखाली देश नौवहन क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान मिळवत आहे - सर्वानंद सोनोवाल
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश नौवहन क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान मिळवत असल्याचं केंद्रीय नौवहन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. भारतीय नौवहन महामंडळच्या मुंबईत झालेल्या हिरकमहोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. परिवहनामुळेच परिवर्तन शक्य होतं त्यामुळेच जलवाहतूक, रेल्वे, आणि रस्तेवाहतुकीला अधिक भक्कम केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. संपर्क आणि दळणवळण क्षेत्रात देशाची प्रतिमा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते भारतीय नौवहन महामंडळच्या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन करण्यात आलं. त्यांनी एस सी आय चेन्नईच्या जहाजाला दृकश्राव्य माध्यमातून हिरवा झेंडाही दाखवला. ६ मार्च रोजी स्वर्ण कृष्णा या जहाजाचं संचालन पहिल्यांदाच महिलांनी केलं होतं; त्या जहाजावरील प्रशिक्षक अधिकारी महिलांचा सन्मान काल सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आला.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.