टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज बांग्लादेश विरुद्ध वेस्टइंडीज तसंच पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामने होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज बांग्लादेश विरुद्ध वेस्टइंडीज तसंच पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी साडेतीन वाजता शारजा इथं, तर दुसरा सामना संध्याकाळी साडेसात वाजता दुबईत सुरु होईल. या स्पर्धेतल्या सर्व सामन्यांचं थेट समालोचन आकाशवाणीवरुन प्रसारित केलं जात आहे. या स्पर्धेत काल रात्री दुबई इथं झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेवर सात गडी राखून मात केली. विजयासाठी श्रीलंकेनं दिलेलं १५५ धावांचं लक्ष्य १७ षटकातच ३ गडी राखून ऑस्ट्रेलियानं पार केलं. त्यांचा सलामीचा फलंदाच डेविड वॉर्नरनं झटपट अर्धशतक झळकावत एकूण ६५ धावांचं मोलाचं योगदान या विजयात दिलं. ऑस्ट्रेलियानं सलग दोन विजय मिळवले असून त्यांचा पुढचा सामना येत्या शनिवारी इंग्लंडशी होणार आहे. 

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image