राज्यसेवा पूर्व परीक्षा २ जानेवारी २०२२ ला होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनातल्या विविध विभागांमधल्या विविध संवर्गातली एकूण २९० पदांच्या भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगानं काल राज्य सेवा पूर्व परीक्षेची घोषणा केली. या भरतीअंतर्गत गट अ ची एकूण १०० तर गट ब ची १९० पदं भरली जाणार आहेत. येत्या २ जानेवारीला राज्यभरातल्या ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाईल. परीक्षेसाठी आजपासून येत्या २५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. हा अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारला जाणार असून, तो mpsconline.gov.in आणि mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. उमेदवारांना अर्ज भरतांनाच परीक्षेसाठीच्या जिल्हा केंद्राची निवड करावी लागणार आहे.