जिंजी किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकार ५० लाख रुपये देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडू मधील ज्या जिंजी किल्ल्यातील सदरेवरून राजाराम महाराजांनी स्वराज्याचा कारभार आठ वर्षे चालवला, त्या सदरेच्या जतन संवर्धनासाठी, राज्य शासनामार्फत 50 लाख रुपयांचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. गड-किल्ल्यांचं जतन आणि संवर्धनाच्या कामांचं सनियंत्रण करणाऱ्या सुकाणू समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते.