मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत राज्यात २ लाख किलोमीटरचे रस्ते

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतला. सध्या राज्यात पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजना राबवली जात आहे. ही योजना राबवतांना येणाऱ्या अडचणी दूर करुन, या योजनेतल्या कामांसाठी मनरेगामधुन आवश्यक निधी उपलब्ध व्हावा यासाठी, मनरेगा आणि राज्याची रोहयो यांचं एकत्रीकरण केलं जाणार आहे. यातून मनरेगामध्ये होणाऱ्या विविध कामांमधल्या अकुशल आणि कुशलच्या संयोजनातून शेत-पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक गावात सरासरी ५ किलोमीटरच्या शेत, पाणंद रस्त्यांची गरज आहे. राज्यात अशा रितीनं २ लाख किलोमीटर लांबीचे रस्ते बांधता येणार आहेत.