गडचिरोली जिल्ह्यात एटापल्लीमधून दोघा नक्षलवाद्यांना अटक

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली पोलीसांनी केलेल्या कारवाईत दोन नक्षलवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेले दोन्ही नक्षलवादी एटापल्ली इथल्या सुरजागड लोहप्रकल्पाविरोधात ग्रामसभा कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या रॅलीत सहभागी झाले होते. या दोघांवर अनेक गुन्हे दाखल होते. या दोघांपैकी एक जण सशस्त्र दलम या संघटनेचा तर एक जण जनमिलिशिया या संघटनेचा सदस्य होता. शासनानं या दोघांवरही प्रत्येकी दोन लाख रुपयांचं बक्षिस ठेवलं होतं.