आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये पहिला उपांत्य सामना

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएल किक्रेट स्पर्धेमध्ये पहिला उपांत्य सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता दुबईत हा सामना सुरु होईल. साखळी सामान्यांमध्ये गुणतालिकेत २० गुणांसह दिल्ली कैपिटल्स अग्रस्थानी आहे. त्याखालोखाल चेन्नई सुपर किंग्स १८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचेही १८ गुण आहेत. मात्र धावगती चेन्नईपेक्षा कमी असल्यानं ते तिसऱ्या स्थानावर आहेत. कोलकत्ता नाईट राइडर्स चौथ्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बगळुरु आणि कोलकत्ता नाईट राइडर्स  यांच्यात उद्या सामना होईल.