कोरोनाकाळात आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या वीमा संरक्षणात आणखी ६ महिन्यांची वाढ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या संकटकाळात कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत दिलेल्या विमा संरक्षणाचा अवधी, आणखी १८० दिवसांनी वाढवण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं घेतला आहे. कोविड रुग्णांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना संरक्षण कवच मिळावं यादृष्टीनं ही योजना सुरु केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या विमा पॉलिसीचा कालावधी आजपासून १८० दिवसांसाठी वाढवण्यात आल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.