नक्षलवाद्यांच्या पेरमिली दलमचा सदस्य मंगरु कटकू मडावी याला अटक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेला नक्षलवाद्यांच्या पेरमिली दलमचा सदस्य मंगरु कटकू मडावी याला पोलिसांनी पेरमिली परिसरातून अटक केली आहे. विशेष अभियान पथकाचे जवान पेरमिली परिसरात गस्तीवर असताना मंगरुला ताब्यात घेण्यात आले. मंगरु मडावी हा भामरागड तालुक्यातल्या विसामुंडी येथील रहिवासी आहे. तो नक्षल्यांच्या पेरमिली दलमचा तसंच अॅक्शन टीमचा सदस्य होता. शिवाय दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटनेचाही तो वरिष्ठ कॅडर होता, अशी माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. त्याच्यावर खुनाचे ३ आणि चकमकीचा १ असे ४ गुन्हे दाखल आहेत. शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते, असे गोयल यांनी सांगितले. दरम्यान, नक्षलवादयांनी हिंसेची वाट सोडून आत्मसमर्पण करावे, असे आवाहन अंकित गोयल यांनी केले आहे.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image