बंदमुळे झालेले नुकसान राज्य सरकारकडून भरुन घेण्याची भाजपची मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आजच्या सरकार-पुरस्कृत बंदची न्यायालयानं दखल घ्यावी आणि झालेल्या नुकसानाची भरपाई राज्य सरकारकडून घ्यावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली. महाविकास आघाडीचा आजचा बंद म्हणजे ढोंगीपणाचा कळस असल्याची टीकाही त्यांनी केली. या बंदला लोकांची साथ मिळाली नसून प्रशासनाची मदत घेऊन धाक-दपटशाहीनं काही ठिकाणी बंद यशस्वी झाल्याचं सांगितलं गेलं असं ते म्हणाले.लखीमपूर इथली घटना गंभीर आहे, पण आजचा बंद ही त्या घटनेबाबत संवेदना नसून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. 

 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image