टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताची लढत पाकिस्तान बरोबर  

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ब गटाच्या पहिल्या सामन्यात आज भारताचा सामना पाकिस्तानबरोबर होणार आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता दुबईत हा सामना सुरु होईल. एकदिवसीय आणि टी- ट्वेंन्टी विश्वचषक स्पर्धांमध्ये भारतानं आतापर्यंत पाकिस्तान विरुद्धचे सर्व सामने जिंकले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकाचे एकदिवसीय सामने सात वेऴा तर टी-ट्वेंटीचे विश्वचषक सामने पाच वेळा झाले आहेत. या सर्व सामन्यांमधे भारतानच विजय मिळवला आहे. याही स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी उत्तम राहील, असं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानं बातमीदारांना सांगितलं. विश्वचषकातल्या सर्व सामन्यांचं धावतं वर्णन आकाशवाणीवरून प्रसारीत केलं जात आहे.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image