लेखक विश्वास पाटील यांना ‘राजीव सारस्वत सन्मान’ प्रदान

 

मुंबई (वृत्तसंस्था) : श्रुती संवाद साहित्य कला अकादमीतर्फे देण्यात येणारा ‘राजीव सारस्वत सन्मान’ पानिपत, महानायक, झाडाझडती यांसह अनेक साहित्यकृतींचे लेखक विश्वास पाटील यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन इथं काल प्रदान करण्यात आला. प्रसिध्द साहित्यिक, कवी आणि हिंदुस्थान पेट्रोलियममधे महाव्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या राजीव सारस्वत यांचं मुंबईवर झालेल्या 26 नोव्हेंबर 2008 च्या अतिरेकी हल्ल्यात निधन झालं होतं. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रुती संवाद साहित्य कला अकादमीतर्फे साहित्यिकांना ‘राजीव सारस्वत सन्मान’ देण्यात येतो. कार्यक्रमाला श्रुती संवाद अकादमीचे अध्यक्ष अरविंद राही, हिंदुस्थान पेट्रोलियमचे व्यवस्थापक पुष्प जोशी आदी उपस्थित होते.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image