राज्यातली नाट्यगृह येत्या २२ ऑक्टोबर पासून पुन्हा उघडणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली नाट्यगृह येत्या २२ ऑक्टोबर पासून पुन्हा उघडणार असून रंगभूमीचा पडदा उघडताच पहिला नाट्य प्रयोग मुंबईतल्या रंगशारदा इथं होणार आहे. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून नाटकाचा पहिला प्रयोग समारंभपूर्वक सादर केला जाणार आहे.  या निमित्तानं अभिनेते प्रशांत दामले यांच्या गाजलेल्या "एका लग्नाची पुढची गोष्ट" या नाटकाचा खास प्रयोग ठेवण्यात आला आहे. यावेळी शासनाच्या आदेशानुसार ५० टक्के क्षमतेने रसिकांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे.  नाट्य रसिकांचं स्वागत रेड कार्पेट आणि  गुलाबाचं फुल देऊन केलं जाईल. या प्रयोगासाठी काही मराठी कलावंताना खास आमंत्रण देण्यात आलं आहे.