रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना कोविड१९ प्रतिबंधक लसीची अतिरिक्त मात्रा द्यावी, जागतिक आरोग्य संघटनेची शिफारस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना कोविड१९ प्रतिबंधक लसीची अतिरिक्त मात्रा द्यावी, अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेनं केली आहे. आरोग्य संघटनेच्या रोगप्रतिकारशक्तीविषयक तज्ञांच्या धोरणात्मक सल्लागार गटानं ही शिफारस केली आहे. अशा व्यक्तींना मानकांप्रमाणे लसीच्या मात्रा दिल्या तरी देखील, त्यांच्यात कोविड१९ला प्रतिकार करता येण्याइतकी रोगप्रतिकार शक्ती निर्माण होण्याची शक्यता कमी असू शकतो, तसंच या आजारानं त्यांना सर्वाधिक धोका पोहचू शकतो, त्यादृष्टीनं ही शिफारस करत असल्याचं या गटानं म्हटलं आहे. सरकट सगळ्याच लोकांना लसीची अतिरिक्त मात्रा द्यावी अशी आपली शिफारस नसल्याचंही या गटानं स्पष्ट केलं आहे.