कौशल्य विकास हा शासकीय योजनांचा गाभा - पियुष गोयल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कौशल्य विकास हा शासकीय योजनांचा गाभा आहे म्हणूनच सरकार उद्योग, वस्त्रोद्योग, मोटार वाहन क्षेत्रसाठी मोठा निधी देत असून अशा प्रत्येक क्षेत्रात संबंधित कौशल्याच्या विकासाठी संस्था निर्माण केल्या पाहिजेत असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. यासंदर्भात काल झालेल्या एका वेबिनारमध्ये गोयल यांनी देशाच्या शैक्षणिक धोरणामध्येही कौशल्य विकासाला महत्व दिल्याचे सांगितले. यादृष्टीनेच द्वि-पदवी कार्यक्रम, परदेशी विद्यापीठांशी संलग्नता, विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रम, आणि मुक्त कलांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आखले गेले आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशाशी मुक्त व्यापार करार, व्यापक आर्थिक भागीदारी करतानाही शिक्षण क्षेत्र आणि विद्यापीठाची संलग्नता केंद्रस्थानी असल्याचेही गोयल म्हणाले. 

Popular posts
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image