एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यां सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं राज्य सरकारचं आश्वासन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून सध्या अहस्तांतरणीय असलेला चित्रपटगृह परवाना हस्तांतरणीय आणि व्यापारक्षम करावा आणि ही प्रक्रिया सुलभ करावी असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी काल दिले. एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर मुख्य सचिव गृह मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव अपील, सुरक्षा, आनंद लिमये, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, माजी खासदार अशोक मोहोळ आदी उपस्थित होते. कोरोना कालावधीत बंद असलेल्या एक पडदा चित्रपटगृहांना सेवा शुल्कासंदर्भातील मागणीवर सकारात्मक निर्णय घेणे आणि कर शुल्क माफ असलेल्या चित्रपटांवरील राज्य वस्तु आणि सेवा कराचा शासनाकडून परतावा देणे, यासाठी वित्तमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. चित्रपटगृहे पुन्हा सुरू करताना मागील वर्षाचा परवाना नूतनीकरण कालावधी वाढवून देण्याच्या मागणीला  गृहमंत्र्यांनी  मंजुरी दिली.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image