देशाचा रुग्ण बरा होण्याचा दर 97 पूर्णांक 86 शतांश टक्क्यांवर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 28 हजार 246 रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचा देशाचा दर 97 पूर्णांक 86 शतांश टक्के आहे. याच कालावधीत 26 हजार 727 नवबाधितांची नोंद झाली. राज्यात काल 3 हजार 15 नवीन कोरोनाबाधित आढळले तर 3 हजार 1 शे 64 रुग्ण बरे झाले. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97 पूर्णांक 27 शतांश टक्के झालं आहे.