देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 102 कोटींपेक्षा जास्त मात्रांचा टप्पा केला पार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं 102 कोटीपेक्षा जास्त मात्रांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत 77 लाख 40 हजारांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले असून 16 हजार नवीन कोविड 19 प्रकरणांची नोंद झाली आहे. तर 16 हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत. या कालावधीत 561 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98 पूर्णांक 17 शतांश टक्के झाला आहे. जो गेल्या वर्षीच्या मार्चपासून सर्वाधिक आहे. सध्या, सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 72 हजारांहून अधिक आहे. जी 235 दिवसांतील सर्वात कमी आहे. काल 13 लाखांहून अधिक कोविड चाचण्या घेण्यात आल्या. आतापर्यंत देशात 59 कोटी 97 लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत.