सातबारावरील फेरफारातल्या नावाच्या नोंदी वरून मालकी हक्क सिद्ध होत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालमत्तेच्या फेरफारात एखाद्या व्यक्तिच्या नावाची नोंद असली तरी त्यावरून त्याचा मालकी हक्क सिद्ध होत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. म्युटेशनमध्ये असणारी नोंद ही केवळ पालिका प्रशानसनाच्या महसूलविषयक कामकाजासाठी असते. त्यात कोणाचं नाव आहे म्हणून ती व्यक्ती संपत्तीवर दावा सांगू शकत नाही, असा निर्णय न्यायमूर्ती एम.आर.शाह आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठानं काल दिला.