देशात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांपेक्षा बरे झालेल्याची संख्या जास्त

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांपेक्षा बरे झालेल्याची संख्या जास्त होती. काल देशभरात २७ हजार २५४ नवे रुग्ण आढळले. तर ३७ हजार ६८७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ३ कोटी २४ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५४ शंताश टक्के झाला आहे.  सध्या देशभरात ३ लाख ७४ हजार अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांच्या एकूण संख्येपैकी हे प्रमाण फक्त १ पूर्णांक १३ शतांश टक्के आहे.  कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशातल्या सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी १०० टक्के पात्र लाभार्थ्यांना लशीची पहिली मात्रा दिली आहे. दादरा-नगर हवेली, दीव-दमण, गोवा, हिमाचल प्रदेश, लदाख, लक्षद्वीप आणि सिक्कीम यांनी ही कामगिरी केली आहे. मुंबईत काल संध्याकाळपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार चोवीस तासात ३५४ नव्या रुग्णांची नोंद झाली तर १८८ रुग्ण बरे झाले. शहरात आतापर्यंत ७ लाख ११ हजार ७४२ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईचा रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ टक्के असून मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार २१० दिवसांवर आला आहे.

Popular posts
रमजान महिन्यात नमाजासाठी एकत्र जमण्याची परवानगी देता येणार नाही- उच्च न्यायालय
Image
तलिबान सत्तेत आल्यानंनतर अफगाणिस्तानमध्ये ६४००हून अधिक माध्यम प्रतिनिधींनी गमवली नोकरी
Image
राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भावेश शेखावत यांनी २५ मिटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारात पटकावलं सुर्वण पदक
Image
भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Image
येत्या सोमवारपासून ७१ अनारक्षित मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेगाड्या सुरू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय
Image