प्रधानमंत्री २६ तारखेला आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमामधून देश-विदेशातील लोकांना संबोधणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमामधून देश-विदेशातील लोकांना संबोधित करणार आहेत. या मासिक कार्यक्रमाचा हा ८१ वा भाग असून आपले विचार मांडण्यासाठी मोदींनी लोकांना आवाहन केलं आहे. नागरिक आपले विचार नमो अॅप किंवा mygov या मुक्त मंचावर मांडू शकतात. आपण आपला संदेश १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकावर देखील हिंदी आणि इंग्रजीमध्ये नोंदवू शकता. २४ सप्टेंबरपर्यंत हा दूरध्वनी क्रमांक सुरू राहील. १९२२ या क्रमांकावरही मिस्ड कॉल देऊन SMS मध्ये आलेल्या लिंकमार्फतही थेट पंतप्रधानांना आपल्या सूचना नागरिक देऊ शकतात.