भाजपा यापुढे सर्व निवडणुका स्वबळावर लढेल; चंद्रकांत पाटलांची घोषणा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पार्टी आगामी महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, लोकसभा-विधानसभा अशा सर्व निवडणुका स्वबळावर लढेल, असं प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते काल बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथं आले असता पत्रकारांशी बोलत होते.

यापुढे आता आम्ही कोणाशीही युती करणार नाही, कारण युती करून त्यामध्ये भारतीय जनता पार्टीची घोर फसवणुक झाली आहे, असं ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केलेली अटक हे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.