बील गेट्स यांनी आयुष्यमान भारत डिजीटल मिशन सुरु केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं केलं अभिनंदन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक किर्तीचे व्यवसायिक बील गेट्स यांनी आयुष्यमान भारत डिजीटल मिशन सुरु केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. या डिटीटल सेवेमुळे चांगल्या आरोग्य सेवेचं वितरण करता येऊन देशाच्या आरोग्य ध्येय प्राप्त करता येईल असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानतांना भारत आरोग्य सेवांच्या सुधारणेसाठी कठोर परिश्रम करत असल्याचं म्हटलं आहे.