भारत आणि इंग्लंड यांच्यातला चौथा क्रिकेट कसोटी सामना भारताने जिंकला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात लंडन इथं झालेल्या चौथा क्रिकेट कसोटी सामना १५७ धावांनी जिंकून, भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी काल इंग्लंडनं आपला दुसरा डाव बिनबाद ७७ धावांवरून पुढे सुरु केला. त्यांना विजयासाठी आणखी २९१ धावांची गरज होती. मात्र भारतीय गोलंदाजांच्या चांगल्या माऱ्यापुढे इंग्लंडचा संपूर्ण संघ २१० धावांवर माघारी परतला. भारताच्या वतीनं उमेश यादव यानं ३, तर जसप्रित बुमराह, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. रॉय बर्न्स आणि हसीब हमीद या इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकी खेळी केली.दुसऱ्या डावात शतक झळकवलेल्या रोहित शर्मा याला सामना वीराचा किताब देऊन गौरवलं केलं.मालिकेतल्या पाचवा आणि अखेरचा सामना, येत्या १० तारखेपासून ओल्ड ट्रॅफर्ड इथं होणार आहे