देशात बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ९७ पूर्णांक ८५ शतांश टक्क्यावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोरोनाचे २३ हजार नवे रुग्ण आढळून आले. सध्या देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची  एकूण  संख्या २ लाख ७७ हजार २० इतकी असून  ती  गेल्या १९५  दिवसांमधल्या सर्वात कमी स्तरावर आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ९७ पूर्णांक ८५ शतांश टक्के इतकं असून गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत ते सर्वात जास्त  आहे.  देशात काल २८ हजारापेक्षा जास्त  रुग्ण उपचारानंतर बरे झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ कोटी ३० लाख १४ हजार ८९८ इतकी झाली.