अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया अतिशय यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं मत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया अतिशय यशस्वीपणे पूर्ण झाल्याचं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी काल याबाबत प्रथमच अधिकृत प्रतिक्रिया देतान व्यक्त केलं. याबरोबरच अमेरिकेची अफगाणिस्तानमधील 20 वर्षांपासून सुरु असलेली मोहिम संपुष्टात आली.

अफगाणिस्तान सोडणं किंवा तिथला संघर्ष वाढवणं यापैकी एक निर्णय अमेरिकेला घ्यायचा होता असं सांगून बायडन म्हणाले की एक दशकापूर्वी त्या देशात ठरविलेलं उद्दिष्ट पूर्ण करण्यात अमेरिकेला यश मिळालं आहे. विमानाद्वारे स्थलांतराची मोहिम काल संपल्यानंतरही सुमारे 200 जण देशाबाहेर पडू शकले नाहीत हे त्यांनी मान्य केलं.