पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र संत तुकाराम नगर पिंपरी पुणे १८ येथे दि. 10 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2021 पर्यंत मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वेळ सकाळी ९ ते दुपारी ४ वा. पर्यंत या शिबिरामध्ये संधिवात, आमवात, पक्षाघात, वातरक्त, मधुमेह, दमा, कैस गळणे पांढरे होणे, रक्तदाब, लठ्ठपणा सर्व प्रकारच्या पंचकर्म चिकित्सा सल्ला मार्गदर्शन, बालकांसाठी बालदमा, बाल पक्षाघात, पोटदुखी जताचा त्रास, लहान मुलांमधील त्वचा विकार, मुलांचे वजन न वाढणे भूक न लागणे, बिछाना ओला करणे इ तसेच स्त्रियांचे विकार, वंध्यत्व चिकित्सा, प्रसूती पूर्व तपासणी, प्रसूती त्याचबरोबर त्वचा विकार, सौंदर्योपचार, हृदयरोग, पोटाचे विकार, पित्ताशयातील खडे, मूळव्याध, भगंदर, फिशर, हर्निया, अपेंडिसायटिस, हायड्रोसिल, मुतखडा, शरीरावरील लहान मोठ्या गाठी तसेच डोळे, कान, नाक व घसा यांवरील आयुर्वेदीय उपचार सल्ला मार्गदर्शन, त्याच प्रमाणे आहारविषयक व योगविषयक मार्गदर्शन केले जाईल. व्याधींचे योग्य रोग निदान करण्यात येईल चिकित्सा झालेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी आंतररुग्ण विभागात मोफत रहाण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध असेल.
या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एच. येवला यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 7796663366 क्रमांकावर संपर्क साधावा
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.