आशीर्वाद’ संस्था आयोजित २९ वे राजभाषा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात राहून मराठी शिकली पाहिजे तसंच बंगालमध्ये बंगाली भाषा शिकली पाहिजे, असं आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल केलं.‘आशीर्वाद’ संस्थेच्या वतीनं आयोजित २९ वा राजभाषा पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते काल राजभवनात प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. सर्व भारतीय भाषांचा आत्मा एकच आहे, प्रत्येकाने प्रादेशिक भाषांचा सन्मान केला पाहिजे. असंही ते म्हणाले. केंद्र सरकारची कार्यालयं, उपक्रम तसंच राष्ट्रीयीकृत बँका आणि वित्तीय संस्थांना हिंदीच्या प्रसारासाठी हे पुरस्कार देण्यात आले.