प्रधानमंत्र्याना मिळालेल्या विविध भेटवस्तूंचा आणि स्मृतिचिन्हांचा ई- लिलाव आजपासून सुरु

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या विविध भेटवस्तूंचा आणि स्मृतिचिन्हांचा ई- लिलाव आजपासून सुरु झाला आहे. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या खेळाडूंच्या क्रीडासाहित्याचा त्यात समावेश आहे. अयोध्येचं राममंदिर, चारधाम, रुद्राक्ष सेंटर यांच्या प्रतिकृती, चित्र, शिल्पकृती, आणि महावस्त्रं अशा वस्तूंचा त्यात समावेश आहे. इच्छुकांना पीएममेमेंटोज. gov.in या संकेतस्थळावर येत्या ७ ऑक्टोबर पर्यंत खरेदी करता येईल. केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या या लिलावातून मिळणारा निधी नमामि गंगे अभियानासाठी वापरला जाईल.